शेअर बाजार : पैसा कमावणे आवघड, अशक्य नाही .
Stock market: Making money is difficult, But not impossible
कोणत्याही सफल गुतवणुकदाराची कथा वाचून पहा त्यांनी आधी एक स्वप्र पाहिले. लोकांनी त्यांना त्यासाठी मना केले की, असे स्वप्र पूर्ण होणे खूप अवघड आहे. तेव्हा सफल व्यक्ती म्हणते ते अशक्य तर नाही ना? इथूनच सामान्य माणूस आणि विशेष माणूस यांच्यामधील फरक दिसायला लागतो
शेअर बाजारामध्ये पैसे मिळविणे त्या लोकांसाठी अवघड असते, जे फक्त याच्याकडे एक पैसा कमावण्याचा बाजार म्हणून पाहतात गुंतवणूकदाराने जर शेअर बाजाराला आपल्या व्यवसायाचा एक भाग समजले तर त्याच्या दृष्टिकोनात लगेच फरक पडना गुतवणूकदार दीर्घ कालावधीसाठी, पाच ते दहा वर्षांसाठी किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी त्याला सांभाळून ठेवतात मग दिवस, महिना आणि वर्ष मंदीचे असेल तर ते शेअर विकण्याची लालूच टाळतात. दीर्घकालीन बाजाराची दिशा नेहमी वर चढत जाणारी असते. दुसऱ्या बाजूला नफ्याच्या (विक्री) लालसेपासूनही दूर रहा. म्हणजे तुमचा शेअर ५० टक्के किंवा त्यापेक्षा वर गेला असला तरीही जोपर्यंत कंपनीची मुलभूत अवस्था चांगली आहे तोपर्यंत शेअर विक्रीचा विचार मनात आणू नका खर म्हणे शेअर विकणे तुमच्यासाठी विवशता होत नाही तोपर्यंत शेअर विकू नका. अर्थात शेअरची किमत आपल्या व्हॅल्यूपेक्षा जास्त वाढली असेल किंवा तुम्ही शेअर खरेदी केल्यापासून कंपनीत मुलभूत बदल झाले असतील, कंपनी नफ्यात नसेल तर विका.
डॉलर कॉस्ट अवरेजिंग तुम्हाला स्वस्तात खरेदी करण्यासाठी आणि महाग विकण्यासाठी विवश करीत असते. ही सामान्य आणि सशक्त रणनीती आहे. आपल्या प्रत्येक उत्पन्नातील काही भाग शेअर खरेदी करण्यासाठी बाजूला काढून ठेवा
मंद बाजार खरेदी करण्यासाठी असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. शेअर बाजार कमीत कमी २० टक्के कोसळला असेल तर शेअरमध्ये आणखी पैसे गुंतवा. शेअर बाजार जर ५० टक्के कोसळला असेल तर जितके बाँड आणि कॅश उपलब्ध आहे, ती सर्व शेअर खरेदीसाठी वापरा हे भीतीदायक वाटत असले तरीही बाजार नेहमी उसळी मारून वर आला आहे. १९२९ आणि १९३२ मध्ये बाजार पूर्णपणे उद्धवस्त झाला होता तेव्हाही सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी केले होते, जे त्यावेळी विक्रीसाठी उपलब्ध होते.
तुम्ही आपल्या अपेक्षेनुसार शेअरची कामगिरी उपयुक्त मापदंड बनवून त्याची तुलना करायला हवी, हे आवश्यक असते तुम्हाला गुंतवणुकीत प्रगती हवी असेल तर मानकांचा विकास करा. जे शेअर ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत, अशाच प्रकारचे शेअर जवळ ठेवा
हे मापंदड अनेक बाजारातील इंडेक्सवर आधारीत असतात. तुमची गुंतवणूक बाजार सापेक्ष योग्य प्रकारे काम करीत आहे की नाही, ते ठरविण्यासाठी हे तुम्हाला मदत करतात.
आपल्या अपेक्षेच्या विरूद्ध जर एखादा शेअर वर जात असेल तर ती चांगली गुतवणूक असण्याचे आवश्यक असत नाही. उलट जेव्हा तो आपल्यासारख्या इतर शेअरच्या तुलनेत कमी गतीने वर जात असतो. तसेच सर्व घटत जाणारी गुंतवणूक म्हणजे नुकसान आहे, असेही समजण्याचे काही कारण असत नाही.
तुम्ही प्रत्येक गुंतवणुकीची कामगिरी आपल्या अपेक्षेनुसार त्याचे मूल्य जाणण्यासाठी करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या इतर गुंतवणुकीचेही मूल्यांकन करू शकता जी गुंतवणूक तुमच्या अपेक्षेनुसार कामगिरी करीत नाही, विकून त्या पैशाची दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक करा. आपल्या अपेक्षा लवकरच पूर्ण होतील याबद्दल तुम्हाला विश्वास वाटत नाही तोपर्यंत त्या शेअरला विकून त्याची इतर ठिकाणी गुंतवणूक करीत रहा. आपल्या गुंतवणुकीला काम करू द्या. एखाद्या दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी एक ते तीन वर्षांची कामगिरी तशीही निरर्थक असते. शेअर बाजार अल्प कालावधीसाठी मतदान यंत्र तर दीर्घ कालावधीसाठी वेट लिफ्टिंग यंत्र असते.
आता तुम्ही शेअर खरेदीच केले आहेत तर तुम्ही वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीचे समीक्षण करायला हवे. परिस्थती आणि मत बदलत राहते. हा गुतवणुकीचाच एक भाग आहे त्याची चाबी म्हणजे प्रत्येक नवीन सूचनेचे मूल्यांकन आणि क्रियान्वन करीत असते. तसेच दिशा दर्शकानुसार आवश्यक असलेला कोणताही बदल पूर्वी टाकलेल्या पाउलानुसार असायला हवा. तुमच्या बाजाराबद्दलच्या अपेक्षा योग्य होत्या नव्हत्या तर त्या कशामुळे नव्हत्या ? या अंतर्दृष्टीच्या मदतीने तुम्ही आपल्या अपेक्षा आणि गुतवणूक यादी अद्ययावत करा.
तुमचा पोर्टफोलियों तुमच्या जोखीम क्षमतेच्या आवाक्यात आहे का? असेही असू शकते की तुमच्या शेअरने चांगले काम केलेले असू शकते, पण गुंतवणूकच जास्त जोखीमेची आणि अस्थायी स्वरूपाची असू शकते. त्याच्याबद्दल तुम्ही अद्याप विचारच केलेला असू शकत नाही. या जोखीमेमध्ये तुम्हाला सहजपणा वाटत नसेल तर ही वेळ गुंतवणूक बदलण्याची असते
तुम्ही आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहात काय? असेही असू शकते की तुमची गुंतवणूक नक्कीच जोखीमेच्या आवाक्यात असू शकते, तेव्हा ती अतिशय हळुवारपणे प्रगती करीत असेल आणि ते सर्व तुमच्या अपेक्षेनुसार नसेल आता नेहमी हीच स्थिती राहत असेल तर गुंतवणुकीत बदल करण्याचा विचार करा.