शेअर : केव्हा, का, कुठे आणि कसे खरेदी-विक्री करावेत? (भाग 2)
Share: When, why, where and how to trade?
तुमच्या वित्तीय जीवनातील ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला शेअर बाजारामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे गुंतवणूक आवश्य करायला हवी. तुम्ही आपली घामाची कमाई फक्त फिक्स्ड रिटर्न असलेल्या उत्पादनामध्येच गुंतवत असाल, तर तुमची बचत मुद्रास्फितीच खाऊन टाकते त्यामुळे तुमचा व्येय गाठण्याचा कालावधी वाढतच जातो. आपल्या चांगल्या भवितव्यासाठी आपल्या बचतीतील कमीत कमी २०-२५ टक्क भाग दरमहा शेअर बाजारात किंवा बेट म्युचुअल फंडाच्या माध्यमातून गुंतवा.
इथे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, केव्हा खरेदी करावे? माझ्या हिशोबाने पाहिले तर खरेदी करण्यासाठी प्रत्येक वेळ चांगली असते मग त्यावेळी बाजार आपल्या नवीन उंचीवर असो की किमना पातळीवर असो फक्त तुम्ही निवडलेला शेअर चांगला असायला हवा. मग बाजारातील चढ-उताराशी त्याचा काही संबंध असत नाही एखाद्या सेक्टरशी संबंधित चांगली बातमी येत असेल तर, त्या सेक्टरमधील शेअर भाव वाढण्याची शक्यता असते
हा एक खूप मोठा प्रश्न आहे. खूप सारे गुंतवणूकदार याच ठिकाणी फसत असतात खरेदी केलेल्या शेअरची विक्री कधी करावी? काही गुंतवणूकदार तर आपल्याला होणारा चांगल्या प्रकारचा नफाही पदरात पाडून घेऊ शकत नाहीत. शेअरच्या किमती आणखी वाढतील, असा ते विचार करीत असतात, आणि होते मात्र उलटे. त्यामुळे मग त्यांना आपला नफा गमावून बसावे लागते. जेव्हा केव्हा तुम्ही शेअर खरेदी करीत असता तेव्हा ते निश्चित कालावधीसाठी किंवा निश्चित टार्गेटसाठी शेअर खरेदी करीत असाल, तर तेव्हा तुम्ही आपली लोअर आणि अप्पर अशा दोन्ही प्रकारच्या मर्यादा स्पष्ट करून टाका. म्हणजे नुकसान होत असेल तर या किमतीला विकून टाकायचे आणि म्हणजे टॉप लॉस आणखी वर जात असेल तर, अमूक एक नफा झाल्यावर विकून टाकणे, जास्तीचा लोभ नेहमीच वाईट असतो, तेव्हा जास्त लोभ करू नका आणि आपल्या टार्गेटकड े लक्ष द्या. एखादी कंपनी बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त चांगले काम करीत असेल तर, आपले टार्गेट वाढवा आणि त्याकडे लक्ष द्या.
कारण बाजारात प्रवेश करताना आणि त्यातून निघून जाताना हे सहजपणे सांगता येत नाही त्यामुळे गुंतवणूकदाराने स्वतः साठी या गोष्टी थोड्या सोप्या करायला हव्यात. त्यांना आपली गुंतवणूक सुरूच ठेवायची असते की ती काढून टाकायची असते. हे त्यांच्या आर्थिक ध्येयावर अवलंबून असायला हवे. गुंतवणूकदाराचे ध्येय जर दीर्घ कालावधीसाठी असेल तर, त्याने शेअरमधील आपली गुंतवणूक कायम ठेवायला हवी. तेच त्यांना वाढत्या महागाईपासून वाचवू शकते. तसेच त्यांचे भांडवलही वाढते.
इक्विटीपासून चांगले रिटर्न मिळत असले तरीही दरवर्षी ते एकसारखे असत नाहीत. त्याच्यात कमी-जास्त होतच राहते. आता शेअर बाजारातून निघून गुतवणूकदार तेजीचा फायदा करून घेण्यासाठीची संधी गमावतात दीर्घ काळापर्यंत गुतवणूक कायम ठेवूनच ते इक्विटीपासून चांगल्या रिटर्नची अपेक्षा करू शकतात.
गुतवणूक काढून टाकणे किवा कायम ठेवणे याचा निर्णय या गोष्टीवर अवलंबून राहु शकतो की गुंतवणूकदार आपल्या ध्येयासाठी जास्त रिटर्न अपेक्षित करतो की नाही? तेजी असो की कोसळतेपणा असो, बाजारातील प्रत्यक पातळीसाठी गुंतवणूक करून तो सरासरी रिटर्न मिळवू शकतो. शेअर बाजार आपल्यासाठी नाही, असे गुंतवणूकदाराला वाटते तेव्हाच त्याने शेअर मधील आपली सर्व रक्कम काढून घ्यायला हवी जर असे असत नाही तर त्याने आपले ध्येय मिळविण्यासाठी आपली गुंतवणूक वाढवत रहायला हवे. शेअर बाजारात वारंवार आत बाहेर केल्यामुळे काही विशेष लाभ होत नाही गुंतवणूकदारांने सतत आपल्या बचतीचा काही भाग शेअरमध्ये गुंतवत रहायला हवे.
शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्त्वाचा पैलू हाच असतो की, त्याने आपले शेअर कधी, कुठे, का आणि कसे विकायला – खरेदी करायला हवेत ? जर या प्रश्नांची उत्तर गुंतवणूकदाराला माहीत असतील तर, तो कधीही आपले भांडवल गमावून बसत नाही.