तुम्ही रिस्कपासून वाचू शकता (You can avoid risk)

 तुम्ही रिस्कपासून वाचू शकता         You can avoid risk

सक्सेस म्हणजे आपल्याजवळ जे काही आहे, त्यातून आपण जे काही सर्वोत्तम करू शकतो, ते करणे 

आपली घामाची कमाई कुठे गुंतवावी? हा कोणत्याही गुंतवणूकदाराचा सर्वांत महिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. अर्थात मोठ मोठ्या विचारवंतांचे जसे म्हणणे आहे की, कोणत्याही गुतवणूकदाराने आधी हे समजून घ्यायला हवे की आपल्या घामाची कमाई आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी गुंतवू नये.
आपली घामाची कमाई वाचवायची असेल आणि आपले भवितव्य सुरक्षित करायचे असेल तर, त्यासाठी तुम्ही एक चांगली गुंतवणूक करण्याची योजना आखायला हवी. जिथे मग तुमची सर्व कामाई एक बचत म्हणून जमा व्हायला हवी. म्हणजे मग ती तुमच्या कामी येऊ शकेल. असेच व्हायला हवे, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी काही आवश्यक पाउलांकडे लक्ष द्यायला हवे. म्हणजे मग तुम्ही सध्या सर्वत्र सुरू असलेल्या फसवेगिरीपासून आपला बचाव करू शकाल.
गेल्या काही वर्षांमध्य अशा अनेक घटना समोर आल्या आहेत की काही काळातच तुमची रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून किया खूप जास्त प्रमाणात व्याज देण्याची लालूच दाखवून फसवेगिरी केली आहे. नंतर मात्र हे लोक तुमचे सर्व पैसे घेऊन फरार होतात. मग ती पीएसीएलची गोष्ट असो की चैन सिस्टिमच्या माध्यमातून लोकांना जोडण्याची असो. त्यांचे लाखो गुंतवणूकदार आज तिथे आपले पैसे गुंतवून फसवले गेले आहेत. भांडवली बाजार नियंत्रक असलेल्या सेबीने याच आठवड्यात अशी माहिती दिली आहे की, पीएसीएलची खूप मोठ्या मालमत्ता त्यांनी जप्त केल्या
आहेत. त्या विकून गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात येतील. म्हणूनच लक्षात ठेवा की तुम्ही अशा जंजाळात अडकू नका.
चीट फंडासारख्या कंपन्या किंवा कोणीही अशी व्यक्ती जी तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करून देण्याचे किंवा दुप्पटीपेक्षा अधिक देण्याचे सांगतो, त्याच्या वागण्याला मुलू नका. लक्षात ठेवा की आपल्या देशात सरकारी योजनांमध्ये ९ टक्क्याच्या आसपास आणि बँकाच्या एफडी मध्येही वार्षिक ७ ते १० टक्के व्याज मिळते. याशिवाय असे दूसरे कोणतीही संस्था नाही जी तुमची रक्कम कमी कालावधीमध्ये दुप्पट करू शकेल किंवा तुम्हाला यापेक्षा जास्त व्याज देऊ शकेल.
शेअर बाजारात तुम्ही डायरेक्ट एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करून काही काळाने पैसे मिळवू शकता. पण हे नेहमीच जोखीमीचे काम असते. त्यामुळे हे काम तुम्ही अशा एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीला द्यावे, जिच्याकडील अनुभवी आणि व्यावसायिक फंड व्यवस्थापक तुमच्या पैशांची योग्य प्रकारे गुंतवणूक करू शकतील. तसेच तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देऊ शकतील.
काही कंपन्या एक चैन सिस्टिम चालवित होत्या. ज्या गुंतवणूकदारांकडून ११००० रु. घेऊन त्यांना भुलविणाऱ्या ऑफर देत असत. पण त्यांनीही गुंतवणूकदारांचे पैसे गायब केले. सध्या त्यांच्यावर खटले सुरू आहेत. अशा प्रकारे तुम्ही जर एखाद्या क्रेडिट सोसायटीमध्येही पैसे गुंतविले तर त्या क्रेडिट सोसायटीचा काही इतिहास असत नाही. तुमचे पैसे घेऊन ते कधी पळून जातील ते माहीत असत नाही. अशाच प्रकारे तुम्ही जर बीसी किंवा चिटफंड कंपनीमध्ये पैसे गमावले तर तेही गायब होऊ शकतात, त्यामुळे अशा प्रकारच्या भूलथापांना तुम्ही बळी पडणार नाहीत, यासाठी प्रयत्न करा.
गुंतवणूकदाराला वाटले तर तो १०० रुपयांपासून बँकेत, म्युच्युअल फंडात किंवा
विम्यात अथवा सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवू शकतो. लक्षात ठेवा, तुम्ही गुंतवणुकीसाठी
नेहमी बँका, म्युच्युअल फंड किंवा सरकारी योजनांचाच लाभ घ्या.
त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले असते आणि त्यांच्याकडे अनुभवी फंड व्यवस्थापक असतात. ते तुमचे पैसे विविध योजनांमध्ये गुंतवून तुम्हाला सर्वोत्तम रिटर्न मिळवून देतात, हे फंड सरकारी योजना, शेअर बाजार आणि इतर आवश्यक ठिकाणी पैसे गुंतविले जातात. म्युच्युअल फंड सध्या तरी सर्वात पारदर्शी गुंतवणूक आहे. जिथे तुम्ही दररोज आपल्या गुंतवणुकीची किमत आणि रिटर्न पाहू शकता. तसेच त्याचे नियमन सेबी करते गुंतवणूकदारासाठी बँक एफडी एक विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय आहे. इथे व्याज कमी मिळते, पण तुमचे पैसे तिथे सुरक्षित राहतात. तुम्हाला कमी रिटर्न मिळाले तरी चालतील, पण तुमचे पैसे सुरक्षित रहावेत असे वाटत असेल तर, तुम्ही बैंक एफडीचा पर्याय निवडू शकता. किंवा मग त्याच्याऐवजी विविध सरकारी योजना जसे एनपीएस, किसान विकास पत्र, बाँड किंवा इतरांमध्ये गुंतवणूक करू शकता.
गुंतवणूकदारांची इच्छा असेल तर वीमा कंपन्यांमध्येही ते थोडी फार गुंतवणूक करू शकतात. पण लक्षात ठेवा की चैन सिस्टिम, जास्त व्याज देणारे, कमी वेळात पैसा दुप्पट करून देणारे किंवा अशाच प्रकारच्या इतर योजना घेऊन येणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नका. तुमचे पैसे तुमचे असतात आणि तुम्हीच ते चांगल्या प्रकारे सांभाळू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला थोडेसे लक्ष देण्याची आवश्यकता असते.

या तीन गोष्टी फॉलो करा तुम्ही नक्की रिस्क पासून वाचू शकता .

शेअर मार्केट हे गुंतवणुकीसाठी आकर्षक क्षेत्र आहे, परंतु त्यामध्ये नफ्याबरोबरच जोखीमही असते. योग्य माहिती आणि नियोजनाशिवाय शेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच, शेअर मार्केटमधील रिस्क ओळखणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, आणि नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाय योजणे महत्त्वाचे आहे.
1. शेअर मार्केटमधील प्रमुख रिस्क
  
i. मार्केट रिस्क: 
मार्केटमधील चढ-उतारांमुळे शेअर्सची किंमत बदलत असते. त्यामुळे गुंतवणूकदाराला फायदा होण्याऐवजी कधी कधी मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
ii. कंपनीचा परफॉर्मन्स रिस्क:
ज्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आहेत, ती कंपनी नफा कमावण्यात अयशस्वी ठरल्यास गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ शकते.
iii. लिक्विडिटी रिस्क:
एखाद्या शेअरला मार्केटमध्ये खरेदीदार मिळाला नाही, तर त्या शेअरची विक्री करणे कठीण होते, ज्यामुळे गुंतवणूक अडकते.
iv. आर्थिक धोके: 
देशाच्या आर्थिक परिस्थितीतील बदल, महागाई, व्याजदर, किंवा चलनवाढ यामुळे शेअर मार्केटवर परिणाम होतो.
v. सायबर आणि तांत्रिक धोके: 
ऑनलाइन ट्रेडिंग करताना सायबर हल्ले किंवा तांत्रिक अडचणींमुळे नुकसान होऊ शकते.
2. रिस्कपासून वाचण्यासाठी उपाय
i. गुंतवणुकीपूर्वी संशोधन:  
गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचा व्यवसाय, आर्थिक स्थिती, बाजारातील स्थान, आणि भविष्यातील वाढीची क्षमता याचा अभ्यास करा. 
ii. पोर्टफोलिओ वैविध्य (Diversification): 
सर्व गुंतवणूक एका क्षेत्रात किंवा एका कंपनीत करण्याऐवजी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करा. यामुळे एकाच शेअरमधील नुकसान इतर गुंतवणुकीने भरून काढता येते.
iii. स्टॉप-लॉसचा वापर:
शेअर विक्रीसाठी स्टॉप-लॉस आदेश सेट केल्याने किंमत ठराविक मर्यादेपर्यंत कमी झाल्यास शेअर्स आपोआप विकले जातात, ज्यामुळे मोठे नुकसान टाळता येते.
iv. दीर्घकालीन गुंतवणूक:
शेअर मार्केटमध्ये तात्पुरते चढ-उतार सामान्य आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी गुणवत्ता असलेल्या कंपन्यांचे शेअर्स निवडल्यास चांगला परतावा मिळतो.
v. सल्लागारांची मदत:
शेअर मार्केटबाबत तज्ज्ञ सल्लागार किंवा ब्रोकर्स यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. त्यांनी सुचवलेल्या ट्रेंड्स आणि धोरणांचा अभ्यास करा.
vi. योग्य माहिती मिळवा:
बाजारातील घडामोडी, कंपनीचे निकाल, आणि सरकारी धोरणे यांचा अभ्यास ठेवा. कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीनुसार निर्णय घेणे टाळा.
vii. लघु गुंतवणूक सुरू करा:
शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला कमी रकमेने गुंतवणूक करा. अनुभव वाढल्यानंतर हळूहळू गुंतवणूक वाढवा.
3. गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या गोष्टी
1. भावनिक निर्णय टाळा: 
भय, लोभ किंवा तात्काळ नफा कमावण्याच्या इच्छेमुळे घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
2. विमा संरक्षण: 
जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक विमा पॉलिसी घ्या, जेणेकरून अनपेक्षित नुकसानभरपाईसाठी सुरक्षितता मिळेल.
3. रेग्युलर पोर्टफोलिओ पुनरावलोकन:
आपल्या पोर्टफोलिओचा नियमित आढावा घेऊन त्यात सुधारणा करा.
निष्कर्ष
शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, परंतु जोखीम टाळण्यासाठी सतर्कता आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. योग्य अभ्यास, नियोजन, आणि जोखमींचे व्यवस्थापन यामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर होऊ शकते. याद्वारे तुम्ही मार्केटमधील रिस्कपासून वाचू शकता आणि नफा मिळवू शकता.

2 thoughts on “तुम्ही रिस्कपासून वाचू शकता (You can avoid risk)”

Leave a Comment