असफलतेच्या ठोकरा खाल्ल्यानेच जास्तीत जास्त सफलता मिळत असते. एक एक्झिक्युटिव्ह होण्याच्या आपल्या स्वप्रात असफल झाल्यावर मी एक सफल कार्टुनिस्ट झालो.- स्कोट अॅडम्स
शेअर बाजार आजच्या जगातील अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आता तर परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की कोणत्याही देशाचा विकास मोजण्यासाठी तेथील शेअर बाजाराची मजबुती मोजली जात आहे.
जगातील खूप मोठे भांडवल आज शेअर बाजारात गुंतविले गेले आहे.
तसे शेअर बाजाराबद्दल विविध मते असून त्यामध्ये किन्सने म्हटले आहे की, जर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सागरात निर्माण होणाऱ्या बुडबुड्याइतके भांडवल गुंतविले असेल तर काही हरकत नाही, पण तेच बुडबुडे सागराच्या पाण्यापेक्षा जास्त झाले तर मात्र ते जास्त धोकादायक असते. त्यामुळे आज शेअर बाजाराचे महत्त्व खूप वाढले असून ते समजून घेणे सुद्धा आपल्या गुंतवणूकदारासांठी आवश्यक आहे.
शेअर बाजाराचे महत्त्व, कार्य आणि उद्देश तसेच अर्थव्यवस्थेमध्ये असलेले त्याचे योगदान आजही कोणापासून लपून राहिलेले नाही. जगातील सर्व देशांमध्ये शेअर बाजार असतात. पण त्यांना कशासाठी निर्माण केले जाते, त्यांचे योगदान काय आहे? आणि एखाद्या अर्थव्यवस्थेसाठी ते इतके महत्त्वाचे का आहेत? रोज तिथे होणाऱ्या चढ-उताराला बातम्यामध्ये इतके महत्त्व का दिले जाते?
कपन्यासाठी पैसे मिळविण्याचा एक मंच म्हणून शेअर बाजार काम करीत असतो. तिथे कंपनीच्या शेअरची सार्वजनिकरित्या खरेदी विक्री करण्याची परवानगी मिळते.
तसेच सार्वजनिक बाजारामध्ये कंपन्याला आपल्या मालकी हक्काचा काही अंश विकून विस्तार करण्यासाठी आर्थिक भांडवल मिळविण्यासाठी मदत करते. स्टॉक एक्सचेंज गुंतवणूकदारांना प्रतिभूतीच्या व्यापारासाठी लिक्विडिटी म्सण्डे तरलता प्रदान करते. त्यामुळे त्यांना अतिशय वेगाने आणि सहजपणे विकले जाऊ शकते.
व्यवसायासाठी भांडवल मिळविता यावे म्हणून कंपन्या शेअर विक्री करीत असतात. गुंतवणूकदार अनेक शेअर यासाठी खरेदी करीत असतात की, त्यामुळे ते कंपनीच्या विकासात आणि नफ्यात भागिदार होऊ शकतात. तसेच त्या शेअरची मागणी वाढल्यावर ते आणखी चढ्या किमतीत त्याची विक्री करू शकतात. कंपन्या आणि गुंतवणूकदार यांना या सर्वांसाठी मंच उपलब्ध करून देण्याचे काम शेअर बाजार करीत असतो. कंपन्या आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी शेअर बाजाराचे महत्त्व एकसारखे आहे.
शेअर बाजारात एखाद्या कंपनीचे शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर जवळपास नेहमीच ते शेअर खरेदी करणारे आणि विक्री करणारे उपलब्ध असतात. शेअर बाजार असा मंच आहे जिथे नेहमी शेअरची उपलब्धता आणि तरलता कायम असते. याच तरलतेमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे आणि त्यापासून लाभ मिळविणे सहज शक्य होते. प्रॉपटी आणि इतर प्रकारची संपत्ती विकण्यासाठी अशा प्रकारची तरलता असत नाही.
स्टॉक आणि इतर प्रकारच्या संपत्तीची किमत आर्थि घडामोडीच्या गतिशीलतेचा एक महत्वाचा भाग असतो. तसेच सामाजिक मानसिक अवस्थेचा एक संकेतांक असू शकतो. एक अर्थव्यवस्था जिथे शेअर बाजारात वाढ होत असते, तिला विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हटले जाते.
शेअर बाजाराला बहुतेक करून कोणत्याही देशाची शक्ती आणि विकासाचा प्राथमिक संकेतांक समजले जाते. दीर्घ काळापर्यंत वाढत जाणारा शेअर बाजार देशात वाढत जाणाऱ्या आर्थिक घडामोडीचा संकेत देत असतो. पडत किंवा कोसळत जाणारा बाजार देशातील संकुचित होणाऱ्या आर्थिक घडामोडीचा संकेत देतो.
शेअरच्या किमती घरगुती गुंतवणूक आणि विक्रीलाही प्रभावित करीत असतात. म्हणून मग केंद्रिय बँक जसे रिझव्ह बँक शेअर बाजारावर नियंत्रण, व्यवहार आणि वित्तीय प्रणालीच्या योग्य पद्धतीने संचलन होण्यावर लक्ष ठेवून असते. वास्तविकः पाहता देशामध्ये आर्थिक स्थिरतेवर लक्ष ठेवणे हेच आरबीआयचे काम आहे.
प्रत्येक देण्याघेण्यासाठी क्लिअरन्स म्हणूनही एक्सचेंज काम करीत असते. त्याचा अर्थ असा की ते शेअर विक्री करणान्यापासून जमा करीत असतात आणि शेअर खरेदी करणान्याला वितरीत करीत असतात.
तसेच शेअरच्या विक्रेत्याला पैसे देण्याची खात्री देतात. काउंटर पार्टी देण्या घेण्याच्या व्यवहारात डिफॉल्ट झाली तर अशा स्थितीमध्ये स्टॉक एक्सचेंज वैयक्तिक खरेदीदार किंवा विक्रेत्याची जोखीम नष्ट करून टाकतात.
बँक आणि शेअर बाजार मिळून कोणत्याही देशामध्ये वित्तीय प्रणाली सक्षम बनविण्यासाठी आपापले योगदान देत असतात. आकडेवारीनुसार अलिकडच्या काळातील दशकात बहुतेक देशामध्ये घरगुती गुंतवणुकीमध्ये शेअरचा वाटा खूप मोठ्या वेगाने वाढत आहे.
आपल्या देशातही वाढता शेअर बाजार याच प्रकारचे संकेत देत आहे. अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशातील युवकांचा कल एसआयपी आणि म्युच्युअल फंडाकडे वाढताना दिसत आहे. हा सुद्धा अप्रत्यक्ष स्वरूपात शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचाच प्रकार आहे.
शेअर बाजाराचे महत्त्व कोणत्याही देशातील वित्तीय प्रणाली योग्य पद्धतीने चालविण्यासाठी खूपच आवश्यक झाले असून त्याशिवाय आर्थिक घडामोडीना गती मिळेनाशी झाली आहे.
तुम्हीही शेअर बाजार शिका आणि आर्थिक प्रगतीच्या वेगामध्ये सहभागी व्हा.
जो कोणी गुंतवणूकदार एकदा बाजाराचे स्वरूप समजून चुकला की, तो गुंतवणूकदार सफलतेचे नवीन उच्चांक स्थापन करू शकतो. म्हणूनच एका मोठ्या गुंतवणूकदाराने म्हटले आहे की, फक्त आपला उद्देशच माहीत असायला हवा असे नाही तर, बाजाराच्या उद्देशाची माहितीही सफलता मिळविण्यासाठी महत्त्वाची पायरी आहे.
शेअर मार्केट चे महत्व जाणून घेण्यासाठी जाणून घ्या 10 टिप्स
शेअर बाजाराचे महत्त्व
शेअर बाजार हा कोणत्याही देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. हा बाजार केवळ गुंतवणूकदारांसाठीच नाही, तर कंपन्या, सरकारे आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठीही उपयुक्त ठरतो. शेअर बाजाराचे महत्त्व खालीलप्रमाणे समजता येते:
1. कंपन्यांसाठी भांडवल उभारणीचे साधन
शेअर बाजार कंपन्यांना त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल उभारण्याची संधी देतो.
– कंपन्या शेअर्स किंवा डिबेंचर्सच्या स्वरूपात निधी उभारून नवीन प्रकल्प राबवतात.
– यामुळे व्यवसाय विस्तार होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळते.
2. गुंतवणुकीचे माध्यम
शेअर बाजार सर्वसामान्य लोकांना त्यांच्या बचतीचे गुंतवणुकीत रूपांतर करण्याची संधी देतो.
– लघु गुंतवणूकदारांसाठी आर्थिक वाढीसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे.
– दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
3. आर्थिक विकासाला चालना
शेअर बाजाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी एकत्र होतो, जो देशाच्या आर्थिक विकासासाठी वापरला जातो.
– उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी हा निधी महत्त्वाचा ठरतो.
– नव्या उद्योगांना आधार मिळून अर्थव्यवस्था वेगाने विकसित होते.
4. द्रवता (Liquidity)
शेअर बाजारामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या शेअर्सची विक्री सहज करता येते.
– द्रवतेमुळे बाजार अधिक गतिशील आणि आकर्षक बनतो.
– गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार पैसे मिळवण्याचा पर्याय उपलब्ध होतो.
5. भावनिर्धारण आणि पारदर्शकता
शेअर बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या तत्त्वावर कंपनीच्या शेअर्सचे मूल्य निश्चित होते.
– पारदर्शक व्यवहारामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो.
– यामुळे बाजारातील फसवणूक कमी होते.
6. सरकारसाठी उत्पन्नाचे साधन
शेअर बाजारामध्ये होणाऱ्या व्यवहारांवर सरकार कर आकारते, ज्यामुळे सरकारी उत्पन्न वाढते.
– सेबीसारख्या नियामक संस्थांच्या नियंत्रणामुळे व्यवहार सुरक्षित राहतात.
7. जोखीम व्यवस्थापन
शेअर बाजार विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देतो.
– गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओला विविधता देऊन जोखीम कमी करू शकतात.
– शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स अशा विविध साधनांमुळे गुंतवणुकीत स्थिरता येते.
8. आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला चालना
शेअर बाजारामुळे परदेशी गुंतवणूकदारांना देशातील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करता येते.
– परकीय गुंतवणूक देशातील आर्थिक स्थैर्याला चालना देते.
– आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढल्यामुळे देशाच्या चलनाला आधार मिळतो.
9. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यता
शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर भांडवलाची देवाणघेवाण होत असल्याने समाजातील आर्थिक असमानता कमी होण्यास मदत होते.
– शेअर बाजारात सर्वसामान्य नागरिकांपासून मोठ्या उद्योगपतींपर्यंत प्रत्येकाला सहभाग घेता येतो.
10. नवीन संधींचा शोध
शेअर बाजार नवउद्योजकांसाठी आणि स्टार्टअप्ससाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देतो.
– नवकल्पना आणि तंत्रज्ञानाला भांडवलाच्या स्वरूपात प्रोत्साहन मिळते.
निष्कर्ष
शेअर बाजार हा देशाच्या आर्थिक यंत्रणेचा कणा असून तो गुंतवणूक, रोजगार निर्मिती, आर्थिक स्थैर्य, आणि विकासाला चालना देतो. गुंतवणूकदार, कंपन्या, आणि सरकार यांच्यासाठी शेअर बाजाराची भूमिका अनन्यसाधारण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.