मार्केटमधील लॉस न होता पैसे कमवायचा असेल तर फॉलो करा 15 टिप्स
शेअरचे ज्ञान
Share knowledge
आधी शिका कधीही काहीही माहीत नसताना आणि माहीत करून न घेता शेअर मार्केटमध्ये उडी मारू नये का आणि शेअर बाजार चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि मगच त्यामध्ये या .
शिकण्यासाठी स्वतःला वेळ द्या .व्यवसाय विषयक वृत्तपत्रे वाचा .कंपनीचा बिजनेस प्लान समजून घ्या बॅलन्स शीट वाचायला शिका .पी/ई ईपीएस आरओई चांगल्या प्रकारे माहीत करून घ्या .मगच शेअर बाजारात गुंतवणूक करा.
शेअर बाजारात तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करू शकतात .पण सुरुवातीला जी कंपनी तुम्हाला माहित आहे. तिचेच शेअर खरेदी करायला हवे म्हणजे दैनिक जीवनात त्याची उत्पादने वापरत असतात ज्या कंपनीचा बिजनेस तुम्हाला चांगला समजतो त्यामध्ये आंधी गुंतवणूक करा.
शेअर विकण्यासाठी नेहमी आपल्या शेअरचा एक मूल्य नक्की करा .जसे की एखाद्या शेअर तुम्ही हजार रुपये भावाने खरेदी केला असेल तर तेव्हा ते विकण्यासाठी एक टारगेट सेट करा की जेव्हा त्याची किंमत किमात तेराशे रुपये होईल तेव्हाच ते विकायचं तुमच्या शेअरची किंमत तुमच्या अपेक्षित भावावर पोहोचली की त्याला विकून टाका .
आर्थिक खूपच सक्षम असलेल्या एखाद्या कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी करायला हवे त्याच्याबरोबर तिची मॅनेजमेंट कशी आहे. हे पाहायला हवे कारण जी कंपनी आर्थिकदृष्ट्या अपंग किंवा पांगळी असते. किंवा आपल्या व्यवस्थापनामुळे ती अस्वस्थ असते .अशा कंपनीच्या शेअरची किंमत कमी होण्याची शक्यता असते निफ्टी आणि सेंसेस मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्या आपल्या सेक्टरमध्ये खूप चांगल्या कंपन्या असतात .तुम्ही या कंपनीचे शेअर बिनधास्त खरेदी करू शकता.
बहुतेक ब्रोकर तुम्हाला स्टॉप लॉसचा ऑर्डर देण्याचा पर्याय देतात. याचा एक असा फायदा होतो की जशी काही स्टॉकची किमती ढासळतात तेव्हा तुमचे शेअर ऑटोमॅटिकली तुमच्या ब्रोकरच्या वतीने एका ठराविक किमतीवर विकले जातात. त्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करण्यापासून वाचु शकता.
कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करण्याच्या आधी किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवण्याच्या आधी रिसर्च आणि चांगल्या प्रकारचे प्लॅनिंग करा. बाजारावर लक्ष ठेवा. तुम्हाला ज्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे आहेत त्याचे मागील रेकॉर्ड पहा त्याची मॅनेजमेंट पहा भविष्यात होऊ शकणारे राजकीय आणि सामाजिक बदलांचा त्यावर काही परिणाम होऊ शकेल काय याचा विचार करा बाजारात मंदी आणि तेजी याकडे लक्ष ठेवा . एकाच प्रकारच्या व्यवसायामध्ये आपले सर्व पैसे गुंतवू नका. थोडे थोडे करून तुम्ही अनेक प्रकारच्या कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवणूक करायला हवेत.
नुकसान होण्याची भीती आणि शेअरचे भाव वाढल्यानंतर टार्गेट प्राईज पेक्षा जास्त वाढून देण्याची लालसा तुम्हाला जोखीमामध्ये टाकू शकते .त्यामुळे आपण साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावेत. लालुच आणि भीती यापासून एकदम दूर राहायला हवे .
तुम्ही एखाद्या फायनास्निएल प्लॅनरकडे शेअर बाजारशीस सल्ला मागितला तर तो सर्वात आधी देतो .
शेअरची खरेदी विक्री करण्यामध्ये आपला टाईम वेस्ट करू नका. तुमचे शेअर जर टारगेट प्राईज वर पोहोचले असतील. तर त्यांना लवकरच लवकर विकून टाकावे. शेअर चा भाव आणखीन वाढण्याची वाट पाहू नका. आणि समजा तुमच्या शेअरचे भाव जर कमी होत असला तर काही काळानंतर त्याचे भाव वाढेल पुन्हा वाढेल याची वाट पाहत बसू नका .ते विकून टाका असे केल्यामुळे तुमचे नुकसान कमी होईल .
शेअर म्हणजे एखाद्या कंपनीच्या मालकीत असलेल्या एककाचा हिस्सा. जेव्हा एखादी कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भांडवल उभारते, तेव्हा ती आपल्या कंपनीचे शेअर्स बाजारात विकते. हे शेअर्स खरेदी करणारा व्यक्ती त्या कंपनीचा भागीदार बनतो. याला “शेअर बाजार” असे म्हटले जाते, जिथे शेअर्सची खरेदी-विक्री होते.
शेअर प्रकार
1. इक्विटी शेअर्स:
हे शेअर्स कंपनीच्या मालकीत भागीदारीचे अधिकार देतात. यामध्ये लाभांश (डिव्हिडंड) आणि किंमत वाढीवर आधारित नफा मिळतो.
2. प्राधान्य शेअर्स:
यामध्ये लाभांश आणि मालमत्तेवर प्राधान्य मिळते, परंतु मतदानाचा अधिकार मर्यादित असतो.
शेअर बाजाराचा अभ्यास
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराच्या मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
– मूलभूत विश्लेषण: कंपनीच्या आर्थिक स्थिती, व्यवस्थापन, उत्पादन, आणि उद्योगाचा अभ्यास करते.
– तांत्रिक विश्लेषण: शेअरच्या किमतींच्या बदलाचा इतिहास, ग्राफ, आणि आकडेवारीवर आधारित भविष्यवाणी करते.
शेअर बाजारातील प्रमुख घटक
1. बाजार निर्देशांक: निफ्टी, सेन्सेक्स यांसारखे निर्देशांक बाजाराची स्थिरता दर्शवतात.
2. ब्रोकर: ब्रोकरद्वारे आपण शेअर्स खरेदी-विक्री करू शकतो.
3. डिमॅट खाते: हे खाते शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवण्यासाठी वापरले जाते.
शेअर बाजारातील फायदे
1. उत्कृष्ट नफा: दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगले परतावे मिळण्याची शक्यता.
2. विविधता: विविध उद्योगांमध्ये गुंतवणूक करून धोका कमी करता येतो.
3. लिक्विडिटी: शेअर्स सहज विकून त्वरित रोख पैसा मिळवता येतो.
धोके आणि काळजी
1. जोखीम: बाजारातील चढ-उतारांमुळे नुकसान होऊ शकते.
2. भावनिक गुंतवणूक: घाईत किंवा भीतीने गुंतवणूक करणे टाळा.
3. फसवणूक: चुकीच्या सल्लागारांपासून सतर्क रहा.
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी टिपा
1. अभ्यास करा: बाजारातील मूलभूत माहिती आणि आर्थिक ज्ञान असणे महत्त्वाचे.
2. धैर्य ठेवा: दीर्घकालीन गुंतवणुकीत संयम ठेवा.
3. सल्लागारांचा वापर: अनुभवी सल्लागारांचा सल्ला घ्या.
4. विविधता ठेवा: सर्व गुंतवणूक एका क्षेत्रात न करता वेगवेगळ्या उद्योगांत करा.
शेअर बाजार हे आर्थिक वाढीचे साधन आहे, परंतु यामध्ये गुंतवणूक करताना योग्य माहिती आणि तयारी असणे आवश्यक आहे. योग्य नियोजनाने तुम्ही शेअर बाजारातून चांगला नफा मिळवू शकता.
hi rohidas