Stock Market: Booming, Investment and Caution
शेअर बाजार : तेजी, गुंतवणूक आणि सावधगिरी
आपले प्रॉब्लेम्स हे आपलेच आहेत, हे जेव्हा तुम्ही डिसाईड करता ती वर्षे तुमच्या जीवनातील सर्वात उत्तम वर्षे असतात. तेव्हा तुम्ही त्याचा दोष आपली आई, एकॉलॉजी किंवा प्रेसिडेंटला देत नाहीत. आपले नशीब आपण स्वतः कंट्रोल करू शकतो, हे तेव्हा तुम्हाला रियलाईज होते.
जगातील बहुतेक अपघात वेगामुळे झाल्याचे आढळून येते. म्हणजे स्पीडमुळे होतात. म्हणजेच घाई किंवा गडबडीमुळे होतात. शेअर बाजारातही तेजी येते तेव्हा गुंतवणूकदारांचे चेहरे खुलतात. तसेच बरेचसे लोक या तेजीला बळीही पडतात. याचा अर्थ असा झाला की वेग किंवा तेजी कोणत्याही क्षेत्रातील असली तरी त्याचा अपघाताशी खूप जवळचा संबंध असतो. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी प्रत्येक पाऊल सांभाळूनच टाकायला हवे.
बॅलेन्स फंडात डिव्हिडंड फंडासाठी गुंतवणूक. गुंतवणुकीसाठी बॅलेन्सड फंड हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये सुरक्षिततेसोबतच इक्विटीमुळे क़माई करण्याची संधीही मिळते. डिव्हिडंड ऑप्शनची लालूच दाखवून हे लोकांना विकताही येतात. बरेचसे बॅलेन्सड फंड पूर्वी वार्षिक डिव्हिडंड देत असत. आता ते तिमाही किंवा मासिक डिव्हिडंड देतात. गुंतवणूकदारांच्या हातात हा डिव्हिडंड टॅक्स फ्री येतो. या हिशोबाने गुंतवणूकदारांना ते टॅक्स फ्री उत्पन्नाचा पर्याय म्हणूनही विकले जातात.
हे डिव्हिडंड अनेक वर्षे कमावलेल्या सरप्लस रकमेच्या स्वरुपात गुंतवणूकदाराला दिले जातात. यामध्ये मिळणारी रक्कम किती असेल, याची काही खात्री देता येत नाही. एखाद्या गुंतवणूकदाराने जर याच विश्वासाने बॅलेन्सड फंडात गुंतवणूक केली असेल तर, ते योग्य असत नाही. प्लान रूपी इनव्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे अमोल जोशी म्हणतात, ‘कोणत्याही इक्विटी ओरिएंटेड फंडामध्ये फक्त मासिक उत्पन्न मिळते गुंतवणूक करणे गैर आहे.’ म्हणून
तुम्हाला जर यावेळी एखाद्या इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल तर, त्याचा पुन्हा एकदा विचार करा. या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळविण्यासाठी दीर्घ काळ पर्यंत या गुंतवणुकीशी संबंधित रहावे लागू शकते.
म्युचुअल फंडात गुंतवूक वाढण्याच्या बरोबरीने त्यातून काढली जाणारी रक्कमही आता वाढली आहे. इंडस्ट्रीमधील आकडेवारी असे सांगते की इक्विटी फंडातून गुंतवणूकदारांच्या वतीने काढण्यात येणारी रक्कम दर वर्षी कोटी कोटी रुपयांनी वाढत आहे.
बऱ्याचशा गुंतवणूकदारांनी स्कीम विकून टाकली आहे तर काही गुंतवणूकदारांनी शीप रोकली आहे. दीर्घ कालावधीमध्ये हा घाट्याचा व्यवहार होऊ शकतो. शेअर बाजारात कमकुवतपणा येण्याची आशंका कायम असते. मागील काही वर्षांमध्ये नफा मिळविलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही गोष्ट एखाद्या धक्क्यासारखी होऊ शकते. बाजारात कमकुवतपणा येईल म्हणून तुम्ही आपला पोर्टफोलियो विकून टाकला तर त्यामुळे तुम्ही कंपाउंडिंगच्या फायद्यापासून वंचित राहू शकता. एखाद्या ध्येयासाठी रक्कम गोळा करण्यापासूनही तुम्ही वंचित राहू शकता.
मीड किंवा स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूकः मागील तीन वर्षांमध्ये मीड कॅपचा रिटर्न २३ आणि स्मॉल कॅपचा रिटर्न १७ टक्के राहिला आहे. या फंडाने मल्टी आणि लार्ज कॅप फंडाला खूप मागे टाकले आहे. याच कारणामुळे बरेचसे गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. गेटिंग यू रिचचे संस्थापक रोहीत शहा यांचे म्हणणे आहे, ‘मिड आणि स्मॉल कॅपचा मागील काही वर्षातील परफॉर्मन्स पाहून गुंतवणूकदारांना यामध्येच एक्सपोजर हवे आहे.’ तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की या सेगमेंटमधील एक्सपोजर आता कमी करायला हवे. या सेगमेंटमध्ये व्हॅल्युएशन खूप वाढले आहे.
क़ाही लोक सामान्यपणे कमी रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक करतात. ते क्रेडिट रेटिंग वाढण्याची अपेक्षा असलेल्या बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधीत असतात. अशा प्रकारच्या फंडामधून मिळणाऱ्या चांगल्या रिटर्नमुळे गुंतवणूकदार या सेगमेंटकडे आशेने पाहत आहेत. मनी वर्क्स फायनान्सीयल अॅडव्हायजर्सचे संस्थापक निसरीन मामाजीचे म्हणणे आहे, ‘बाँड फंडाच्या गुंतवणूकदारांनी सुरक्षित खेळायला हवे. क्रेडिट ऑपारच्युनिटीज फंडामध्ये जाणे म्हणजे विनाकारण जोखीम वाढविणे असते.’
गुंतवणूकदारांच्या अपेक्षेला ते अद्याप पूर्णपणे उतरले नाहीत. फंड मॅनेजरचे कॉल वेळेवर न घेतल्यामुळे अनेक गुंतवणूकदार त्यात अडकून पडले आहेत. तुम्हीही डेट फंडला पर्याय म्हणून ड्रायनामिक बाँड फंडामध्ये गुंतवणूक करू शकता.
सल्लागाराकडून माहिती न घेता डायरेक्ट प्लानमध्ये स्वीच करणे, म्युचुअल फंडातील डायरेक्ट प्लानच्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळाले आहेत. यामध्ये तुम्ही फंड हाऊसमधून डायरेक्ट प्लान खरेदी करू शकता. यामध्ये खर्च कमी होतो. अर्थात यामध्ये स्वीच करण्याच्या आधी तुम्ही एखाद्या सल्लागाराचा सल्ला घेणे खूपच आवश्यक असते. तुम्ही स्वतः जर हे काम करीत असाल, तर योग्य फंड निवडण्यामध्ये झालेली कोणतीही चूक तुम्हाला खूप भारी पडू शकते.
याच्या आधीच आम्ही उल्लेख केला आहे त्याप्रमाणे मार्केटमध्ये तेजीच्या वेळी बरेचसे लोक जास्तीत जास्त पैसे कमावण्याच्या मागे लागतात. या घाई गडबडीमध्ये खूप सारे लोक खूप मोठी जोखीम पत्करतात. शेअर बाजाराचे प्रकरण मेंढ्यासारखे असत नाही. खरं तर इथे खूप मोठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. विशेषतः तेजीच्या काळात तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवायचा असतो तेव्हा तरी ही सावधगिरी बाळगायला हवी. गुंतवणूकदाराचा सतर्कपणाच त्याच्या सुरक्षा कवचाचे काम करीत असतो.