शेअर बाजार : जोखीम आणि उत्पन्न (Stock Market: Risk and Yield)

 शेअर बाजार : जोखीम आणि उत्पन्न

Stock Market: Risk and Yield

शेअर बाजार : जोखीम आणि उत्पन्न

जे प्रतीक्षा करतात, त्यांच्यापर्यंतही काही वस्तू पोहचतात, पण त्या संघर्ष करणाऱ्यांनी सोडलेल्या असतात .

तुमचा ‘जोखीम आणि उत्पन्न’ याचा उद्देश जास्त पर्यायांपैकी काही काढून टाकतो. एक गुंतवणूकदार आहात म्हणून तुम्ही वैयक्तिक कंपन्यांचे शेअर खरेदी करू शकता. हा गुंतवणुकीचा सर्वात मुलभूत प्रकार आहे. बॉटम अप पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रकारचा शेअर, तुमचा विचार, त्यांच्या किमती आणि मिळणारा लाभांश यांच्या आधारे खरेदी किंवा विक्री करीत असता तेव्हा शेअरमध्ये थेट गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या फीस पासून वाचवितो तसेच योग्य प्रकारे विविधीकरण करण्यासाठी जास्त प्रयत्नांची अपेक्षा करते.

अशाच शेअरची निवड करा, जे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या गरजेनुसार उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकतील. तुम्ही जर उच्च उत्पन्न गटात मोडणारे असाल तसेच लघु आणि मध्यम उत्पन्नाची किमान गरज असेल, तसेच जोखीम स्वीकारण्याची क्षमताही अधिक असेल तर जास्त करून त्या अधिक वाढणाऱ्या शेअरची निवड करा, जे कमी किंवा शून्य लाभांश देतात. पण त्यांची अपेक्षीत वाढ माध्यमांपेक्षा अधिक असते.

कमी गुंतवणूक असलेले इंडेक्स फंड सर्व सामान्यपणे सक्रिय स्वरुपात प्रबंधित फंडांच्या तुलनेत कमी फीस चार्ज करतात ते जास्त सुरक्षित असतात कारण ते आपले इंडेक्स सर्वांना माहीत असलेल्या इन्डेक्सांवर आधारित ठेवतात. उदाहरणार्थ एखादा इंडेक्स फंड आपाल परफॉर्मन्स बेच मार्क एस-पी. ५०० इंडेक्सच्या शेअरवर आधारीत ठेवीत असेल तर हा फंड जास्त करून किंवा पूर्ण इंडेक्स खरेदी करतो. तसेच तो इंडेक्सच्या कामगिरीची बरोबरी करतो ही एक सुरक्षित गुंतवणूक असते, पण फारशी उत्तेजक नाही. अॅक्टिव्ह शेअर खरेदी करणारा अशा गुंतवणुकीत कमी रस घेतो.

इंडेक्स फंड नवीन गुंतवणूकदारासाठी एक चांगली सुरुवात असू शकते. ‘कमी ‘लोड’ असलेल्या स्वस्त इंडेक्स फंड खरेदी करून ठेवावेत. डॉलर कॉस्ट अव्हरेजिंग स्ट्रॅटजीचा उपयोग करून असे आढळून आले आहे की दीर्घ कालावधीमध्ये ते अॅक्टिव्ह म्युचुअल फंडाला मागे टाकतात. अशा प्रकारचे इंडेक्स फंड निवडावेत जे वार्षिक उत्पन्न आणि इंडेक्स प्रमाण यामध्ये सर्वात कमी असतील

एक्सचेंज ट्रेडर फड (ईटीएफ) हा एक असा इंडेक्स फंड आहे, ज्यामध्ये शेअर प्रमाणे गुंतवणूक केली जाते इटीएफ हा एक असा अनमॅनेज्ड पोर्टफोलियो आहे.(यामध्ये स्टॉक इक्वली मॅनेज्ड फंडासारखे खरेदी आणि विक्री केले जात नाहीत) तसेच कमीशन शिवायही सर्व देण्या घेण्याचे व्यवहार होतात. तुम्ही खास इंडेक्सवर आधारीत ईटीएफ खरेदी करू शकता, जो एखाद्या विशेष उद्योग किंवा वस्तू, जसे की सोने यावर आधारीत असू शकतात ईटीएफ नवशिक्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

तुम्ही अॅक्टिव्हली मॅनेज्ड म्युचुअल फंडातही गुंतवणूक करू शकता. या फंडामध्ये अनेक गुंतवणूकदार आपले पैसे लावत असतात, आणि मग त्यांना शेअर आणि बाँडमध्ये लावत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार पोर्टफोलियोचे शेअर खरेदी करतात. वैयक्तिक गुंतवणूकदार अशा प्रकारचे पोर्टफोलियो तयार करीत असतात, त्यांचे एक विशेष ध्येय असते, जसे दीर्घकालीन प्रगती कारण हे फड अॅक्टिव्हली मॅनेज्ड असतात. ( व्यवस्थापक सतत शेअर खरेदी आणि विक्री करीत असतात. त्यामुळे फंडाचे ध्येय गाठले जाते) त्यासाठी त्यांची जास्त फीस असते म्युचुअल फंड एक्सेन्स रेशो तुमच्या प्रतिलाभ दराला नुकसान पोहचवू शकतात. तसेच तुमच्या आर्थिक विकासामध्ये ते बाधक ठरतात,

काही कंपन्या सेवानिवृत्त गुंतवणूकदारासाठी काही विशेष पोर्टफोलियो सादर करीत असतात. ते ‘अॅसेट अलोकेशन’ किंवा ‘टार्गेट डेट’ फंडस आहेत, जे तुमच्या वयानुसार तुमची मालकी समन्नित करीत असतात. उदाहरणादाखल जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुमचे संकलन इक्विटीच्या दिशेने असते. पण जसे जसे तुमचे वय वाढत जाते, तेव्हा हे संकलन तुमची गुंतवणूक स्थिर उत्पन्न सेक्युरिटीमध्ये बदलले जाते.दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ते तुमच्यासाठी असे करते, जे तुम्ही वयोवृद्ध झाल्यावर तुमच्या स्वतःसाठी करण्याची अपेक्षा बाळगून असता. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे फंडस सामान्य इंडेक्स फंड आणि ईटीएफ फंडाच्या तुलनेत जास्त महागडे असतात आणि तरीही इतर गुंतवणुकीच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी करीत असतात.

Leave a Comment