शेअर बाजार: चुकांपासून संरक्षण
Stock Market: Protection against Mistakes
ज़े लोक व्यवसाय करीत असतात त्यांच्यासाठी एक गोष्ट नेहमी लागू होते. मदी असो की तेजी, त्यांच्यासाठी या दोन्ही संधी नफा मिळवून देणाऱ्याच असतात. त्यामुळे गुतवणूकदारांच्या समोर अशा संधी नेहमी येत-जात राहतात. यापासून बचाव करून कोणताही गुंतवणूकदार नफा मिळवू शकत नाही.
नव्या शिखरावर पोहचल्यावर शेअर बाजार वेगवान कोसळला असे तुम्हाला नेहमीच आढळून येते. यामुळे गुंतवणूकदार घाबरतात. बाजार विशेषज्ञांचे असे म्हणणे असते की आगामी काळात बाजार आणखी कोसळणार आहे. बाजारामध्ये सुधारणा सुरू होते तेव्हा नवीन गुंतवणूकदार बहुतेक करून चुका करीत असल्याचे आढळून येते. या चुकांची त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागते ज्या चुकांपासून गुंतवणूकदारांन आता आपला बचाव करायला हवा, अशा सामान्य चुकांबद्दल सांगत आहे..
गुंतवणूकदार एक किमत नक्की करतात आणि त्या किमतीला येईपर्यंत ते शेअर होल्ड करून ठेवतात. सामान्यपणे ही किमत शेअरची खरेदी किमत असते. काही प्रकरणात ही स्टॉकची ऑल टाईम हाय प्राईसही असू शकते. गुंतवणूकदार ही नक्की केलेली किमत लक्षात घेऊन शेअर ठेवायचे की विक्रीला काढायचे याचा निर्णय घेत असतात. अर्थात कोसळणाऱ्या बाजारात हाय प्राईसचा मोह अवघड जाऊ शकतो या कारणामुळे गुंतवणूकदार तो शेअर जेवढ्या वेळासाठी होल्ड करायला हवा त्यापेक्षा जास्त काळासाठी होल्ड करतात. शेअरच्या किमतीमध्ये अनेक कारणामुळे उतार येऊ शकतो, पण तरीही गुंतवणूकदार खास प्राईसच्या मोहापायी तो शेअर होल्ड करतात तुम्ही जर एखादा शेअर खरेदी केला असेल आणि त्याची किमत कमी होत असेल तर अव्हरेज बाईंग प्राईस कमी करण्यासाठी आणखी शेअर खरेदी करू नका गुतवणूकदार कमी किमतीवर शेअर खरेदी करून आपला लॉस कमी करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात कोसळणाऱ्या बाजारात ही रणनीती योग्य असत नाही. अशा वेळी तुम्ही एखादा चुकीचा शेअर खरेदी केला असेल तर त्यामध्ये आणखीन उतार येऊ शकतो. मध्येच तुम्ही त्याच प्रकारचे आणखी शेअर खरेदी केले तर त्यांच्या किमती कमी झाल्यामुळे तुमचे नुकसान वाढू शकते. या बाबतीत सेंट्रम वेल्थचे चिफ इनव्हेस्टमेंट ऑफिसर कुंज बन्सल यांनी सांगितले की एखादा खराब स्टॉकमध्ये आणखी पैसे गुंतविण्यात काहीही शहाणपणा असत नाही. ते म्हणाले, “तुम्ही ज्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे, तो चांगल्या क्वालिटीचा असेल, तर किमती कमी झाल्यावर तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक वाढवू शकता. या शिवाय दुसऱ्या कोणत्याही परिस्थितीत किमती कमी झाल्या म्हणून गुंतवणूक वाढविता कामा नये. “
जेव्हा शेअर प्राईसमध्ये उतार येतो तेव्हा लोक इनव्हेस्टमेंट आणि रिसर्च रिपोर्टचा थंडाळा घ्यायला लागतात. ते यामध्ये असे काही तथ्य शोधीत असतात की त्यामुळे त्यांचे विचार योग्य ठरतील तसेच ज्यामुळे त्यांचा विचार चुकीचा ठरतो, अशा तथ्यांकडे ते मुद्दाम दुर्लक्ष करतात. बाजारात सुधारणा होत असल्याच्या काळात हा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अर्थात, यामुळे गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेतात तुम्ही एखादा शेअर खरेदी केला असेल आणि त्याबद्दल एखादी नकारात्मक बातमी आली असेल तर, त्याकडे लक्ष द्यायला हवे जे स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत. त्यांना घेऊन तुम्ही भावनेच्या भरात वाहवत जाता कामा नये.
एखाद्या शेअरची किमत ५२ आठवड्यातील किमान किमतीवर पोहचत असेल तर, कोसळल्या बाजारात काही गुंतवणूकदार वॅल्व्हयू इनव्हेस्टमेंट करू लागतात. ते अग्रेसिव्ह पद्धतीने अशा शेअरचा शोध घेत असतात, ज्याची किमत ५२ आठवड्यातील किमान किमतीवर पोहचली आहे. त्यांना असे वाटते की या शेअरमध्ये आधीपासूनच पडझड झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यात गुंतवणूक केल्यामुळे चांगला फायदा मिळू शकेल. अर्थात यापैकी काही स्टॉक्स व्हॅल्यू ट्रॅप्ड सिद्ध होऊ शकतात. या बाबतीत ओम्नी सायन्स कॅपिटलचे सीईओ विकास गुप्ता यांनी सांगितले, ‘५२ आठवड्यातील किमान किमत एखाद्या स्टॉकसाठी रिसर्चचा विषय असू शकतो, पण फक्त किमती पाहून अशा प्रकारच्या शेअरमध्य गुंतवणूक करणे योग्य होणार नाही.’
कोसळत्या बाजारात अनेक ब्रोकर्स हाऊस गुंतवणूकदारांना लीवरेजवर डाव लावायला सांगतात. अर्थात अशा प्रकारच्या डावामध्ये नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून मग अस्थीर स्वरुपाच्या बाजारात अशा प्रकारच्या गुंतवणुकीपासून शक्य तितके बचाव करून रहायला हवे. उधार पैसे घेऊन गुंतवणूक करण्यात फारसा शहाणपणा असत नाही तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला कर्जाऊ घेतलेल्या रकमेवरील व्याजापेक्षा जास्त रिटर्न देत असेल तरच अशा प्रकारचा डाव यशस्वी होऊ शकतो. अर्थात ढासळत्या बाजारात असे होणे खूपच अवघड असते. त्याच्या बरोबरीने गुंतवणुकींच्या कालावधीकडेही तुम्ही थोडे लक्ष द्यायला हवे..
मार्केटमध्ये झालेली मोठ्या प्रमाणातील कोसळणूक गुंतवणूकदारामध्ये गोंध माजविण्यासाठी पुरेशी ठरते. अनेक गुंतवणूकदार अशा बाजारामध्ये अधिक पैसे गुंतविण्याच्या मोहात पडतात, तर काही गुंतवणूकदारांना असे वाटते की अशा परिस्थितीमध्ये बाजारातून आपले पैसे काढून घेण्यातच शहाणपणा आहे बाजारात सुधारणा होत असताना अनेक गुंतवणूकदार आपल्या योजना बाजूला ठेवून दुसऱ्याचे पाहून गुतवणूक करतात. टीबीएनजी कॅपिटल अॅडव्हायजर्सचे संस्थापक आणि सीईओ तरुण बिराणी म्हणतात, ‘अशा वेळी गुंतवणूकदार धीर सोडतात मग पैसे गमावतात. त्यामुळे आपल्या लॉग टर्म फायनान्सिएल गोलकडे लक्ष देणेच अशा वेळी चांगले “
म्युचुअल फंड तुमची जोखीम कमी करतात, पण अनेक वेळा रिटेल गुंतवणूकदारही म्युचुअल फंडाच्या मार्गावरून वाटचाल करताना आपल्या पोर्टफोलियोमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करतात. अनेक गुंतवणूकदार एकाच सेक्टरमधील अनेक कंपन्यामध्ये एकत्रित गुंतवणूक करतात अशा प्रकारची चूक तुमचे पैसे जोखीमेमध्ये टाकत असते त्याच बरोबर तुमचा पोर्टफोलियोही कमकुवत करीत असते पोर्टफोलियोमध्ये विविधता असणे ही चांगली गोष्ट असली तरीही त्यात समजूतदारपणा आणि शहाणपणा दाखविण्याची आवश्यकता असते. एकाच वेळी अनेक नावामधून होणारा असा प्रवास तुम्हाला अनेक वेळा बुडवूही शकतो.
आता तुम्हाला कळले असेलच की गुंतवणूकदाराचा शहाणपणाच त्याला त्याच्या जोखमीतूनही नफा मिळवून देऊ शकतो. तसेच थोडासा निष्काळजीपणाही त्याचे सर्व पैसे बुडवू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडण्याऐवजी तार्किकदृष्ट्या गुंतवणुकीचे प्लॅनिंग करा तसेच योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.