शेअर बाजारात फंडामेंटल अॅनालॅसिस
Fundamental analysis in the stock market
सफलता ही आनंदाची चाबी नाही, तर आनंद ही सफलतेची चाबी आहे. तुम्ही जे काही करता त्यावर प्रेम करीत असाल तर तुम्ही सफल होता .
जीवनाच्या धावपळीत एका व्यक्तीने आपल्या दिवसभरातील कामांचे मूल्यांकन करायला हवे. तेव्हाच तो दुसऱ्या दिवसासाठी एखादे टार्गेट नक्की करू शकतो. त्याला आपल्या क्षमता आणि कमकुवतपणाचे भान ठेवणेही आवश्यक आहे. अशाच प्रकारे शेअर बाजारातील गुंतवणूकदारालाही काही ना काही वेळाने सर्व समजांची पडताळणी आणि तपासणी करणे आवश्यक आहे.
कोणताही गुंतवणूकदार जास्तीत जास्त रिटर्न मिळविण्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करतो. ज्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, अशाच प्रकारचे शेअर तो खरेदी करीत असतो. तसेच जे शेअर कमकुवत आणि अस्थीर राहण्याची शक्यता असते, अशा प्रकारचे शेअर तो विकून टाकीत असतो, अशा शेअरची ओळख करून घेण्यासाठी टेक्निकल आणि फंडामेंटल रिसर्चचा किंवा अॅनालॅसिसचा आधार घेतला जातो.
टेक्निकल आणि फंडामेंटल विश्लेषण करण्याच्या पद्धती वेग वेगळ्या आहेत. अर्थात तांत्रिक प्रकारचे विश्लेषण प्रत्येक प्रकारच्या बाजारात होत असते. त्यामध्ये कमोडिटी, फॉरेक्स, शेअर किंवा बाँड यांचा समावेश असतो. ते समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टीवर विशेष लक्ष द्यावे लागेल.
ज़से फंडामेंटल विश्लेषण काय आहे? कोणत्याही शेअरच्या संभाव्य भवितव्याचे आकलन अनेक व्यापक संकेतांच्या आधारे केले जाते. त्यामध्ये देशाचा जीडीपी, महागाईचा दर, व्याज दराच्या बरोबरीने कंपनीची विक्री, नफ्याची क्षमता, रिटर्न ऑन इक्विटी, रोख स्थिती आणि लायबिलिटीचा समावेश होतो.
अशाच प्रकारे तांत्रिक विश्लेषणही समजून घ्यावे लागेल. तांत्रिक विश्लेषणासाठी बाजारातील ऐतिहासिक आकडेवारीचा वापर केला जातो. त्यामध्ये शेअरच्या किमतीमध्ये होणारा चढ-उतार, व्हॉल्युम, ओपन इंट्रेस्ट, इ.चा समावेश असतो. भविष्यात शेअरची दिशा काय असेल हे याच्या आधारे ठरविले जाते.
तांत्रिक विश्लेषक फंडामेंटल आकडेवारीकडे दुर्लक्ष करतात. त्यांची प्रासंगिकता असत नाही, हे काही त्याचे कारण असत नाही तर, खरी गोष्ट म्हणजे बाजाराने या आकडेवारीकडे आधीच लक्ष दिलेले असते. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा त्यांचे विश्लेषण करण्याची आवश्यकता असत नाही. या पद्धतीचा पहिला सिद्धांतच हा आहे की, ‘किमतीमध्ये प्रत्येक गोष्टीचा समावेश केलेला असतो. ‘
या दोहोंपैकी कोणते चांगले असते हे सांगणे तसे खूपच अवघड आहे. त्याचे कारण असे आहे की, तांत्रिक विश्लेषण लहान कालावधीमधील ट्रेडिंग, आणि गुंतवणूकयाच्या बाबतीत उपयुक्त असते. फंडामेंटल अॅनालॅसिस दीर्घ कालावधीच्या गुंतवणूक प्रकरणात उपयुक्त असते. फंडामेंटल अॅनालॅसिस दीर्घ कालावधीसाठी उप.युक्त असते. खरं तर दोन्ही पद्धती फायदेशीर आहेत, म्हणून बहुतेक ब्रोकर्स फर्म दोन्हीचा वापर करीत असतात.
सफल गुंतवणूकदार दोन्ही पद्धतीचा वापर करीत असतात. फंडामेंटल विश्लेषण सांगते की कोण कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. तर तांत्रिक विश्लेषण सांगते की त्यामध्ये कधी पैसे गुंतविल्यामुळे नफा वाढू शकतो. आम्ही याच्या आधीही सांगितल्याप्रमाणे एखाद्या घरातील खर्च भागविण्यासाठी
आणि योग्य प्रकारे चालविण्यासाठी फक्त वस्तुंच्या सध्याच्या किमती लक्षात घेऊन भागत नाही तर, भविष्यात होणारी त्या किमतीततली वाढही लक्षात घ्यावी लागते. एका उदाहरणावरून तुम्ही हे समजू शकता. माझा एक मित्र आहे. त्याने एक गाडी खरेदी करण्याचा प्लॅन केला. त्याने गाडीची निवडही केली, पण त्याला दुसऱ्या एका मित्राने सल्ला दिला की पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या आहेत. म्हणून सीएनजी असलेली गाडी घे. त्याने असेच केले कारण त्याची गरज स्थानिक स्वरुपाची होती. याचा अर्थ असा झाला की शेअर बाजाराची पडताळणी फक्त आणि फक्त बाजारानुसारच करता कामा नये तर, आपल्या गरजेनुसारही करायला हवी.