शेअर गुंतवणूकदाराचे मानसशास्त्र
Psychology of the Share Investor
असफलता मिळाल्याशिवाय सफलतेला काहीही चव असत नाही, तिची काही समज असत नाही.
आधीचे गुंतवणूकदार कशा प्रकारे व्यवहार करीत असत हे नवीन गुंतवणूकदाराला माहीत असणे आवश्यक असते. त्यांचे मानसशास्त्र समजून घेतल्यावरच आपण आपली पुढची धोरणे योग्य प्रकारे लागू करू शकतो. गुतंवणूकदाराचे मानसशास्त्रच त्याला सफल किंवा असफल गुंतवणूकदार म्हणून ओळख मिळवून देत असते. म्हणजे गुंतवणूकदाराचे हृदय जर कारभार करणारे नसेल तर तो जास्त काळ बाजारात टिकाव धरू शकत नाही.
शेअर बाजार नवीन शिखरावर पोहचल्यानंतर त्यामध्ये वेगवान पडझड होऊ लागते. यामुळे गुंतवणूकदार घाबरून जातात. बाजार आणखी जास्त कोसळू शकतो, असे त्यांना वाटते. खरं तर हीच ती वेळ असते, जेव्हा बाजारात करेक्शन होत असते. तेव्हाच गुंतवणूकदार सर्वात मोठ्या चुका करीत असतात. अशा चुकांची त्याना खूप मोठी किमत मोजावी लागते. याच वेळी गुंतवणूकदारांनी मानसशास्त्रीय पद्धतीने स्वतःला सावरायला हवे असते.
शेअर बाजारात गुंतवणूकदार एक किमती नक्की करीत असतात. त्या पातळीपर्यंत ते शेअर होल्ड करून ठेवीत असतात. साधारणपणे ही किमत शेअरची खरेदी किमत असते. काही प्रकरणात ही स्टॉकमधील ऑल टाइम हाय प्राईसही असू शकते. गुंतवणूकदार ही पातळी लक्षात ठेवूनच शेअर कायम ठेवण्याची किंवा काढून टाकण्याची वाट पाहत असतात. कोसळत जाणाऱ्या बाजारामध्ये गुंतवणूकदाराला अशा प्रकारच्या विशेष किमतीचा मोह महागात पडू शकतो. याच मानसशास्त्रीय दबावामुळे गुंतवणूकदार जास्त वेळासाठी शेअर होल्ड करतात, जितक्या काळासाठी त्यांनी तो करायला हवा होता. शेअर प्राईसमध्ये अनेक कारणांमुळे पडझड होऊ शकते. पण गुंतवणूकदार विशेष प्राईसच्या मोहापायी शेअर होल्ड करून ठेवतात. शेअरची किमती पुन्हा त्या पातळीपर्यंत पोहचेल, अशी गुंतवणूकादाराल आशा असते. असे करताना ते स्टॉकच्या फंडामेंटलची पडताळणी करीत नाहीत.
बाजारामध्ये प्रत्येक जण चुका करीत असतो, पण काही गुंतवणूकदार चुका सातत्याने वाढवित असतात. समजा तुम्ही एखादा शेअर खरेदी केला आहे आणि त्याची किमत सातत्याने कमी होत असेल तर, आवरेज बाईंग प्राईस कमी करण्यासाठी आणखी शेअर खरेदी करू नका. गुंतवणूकदार कमी किमतीवर शेअर खरेदी करून आपले नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. अर्थात कोसळणाऱ्या बाजारात ही धोरणे कामाची असत नाहीत. तुम्ही एखादा चुकीचा शेअर खरेदी केला असेल तर, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडझड होऊ शकते.
मध्येच तुम्ही त्याच प्रकारचे आणखी शेअर खरेदी केले तर त्याच्या किमती आणखी खाली घसरल्यामुळे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. या बाबतीत सेंट्रल वेल्थचे मुख्य इनव्हेस्टमेंट ऑफिसर कुंज बंसल यांनी सांगितले की, एखाद्या कराब स्टॉक मध्ये आणखी पैसे गुंतविण्यात काहीही शहाणपणा असत नाही. त्यांनी पुढे म्हटले, ‘तुम्हीज्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे, तो चांगल्या दर्जाचा असेल तर, किंमत कमी झाल्यावर त्यामध्ये आणखी गुंतवणूक केली जाऊ शकते. याशिवाय कोणत्याही कारणामुळे त्यात पडझड झाली तर शेअरमध्ये गुंतवणूक वाढविता कामा नये.’ त्यांनी असे म्हटले आहे की, तुम्ही कोणत्याही शेअरमध्ये किती गुंतवणूक वाढवायची याची एक मर्यादा आधीच आखायला हवी. शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदाराचे मानसशास्त्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात
बाजारातील चढ-उतारामुळे प्रभावित होत असते. शेअरच्या किमतीमध्ये उतार येतो तेव्हा बरेचसे लोक इनव्हेस्टमेंट न्यूज आणि रिसर्च रिपोर्टचा धुंडाळा घ्यायला लागतात. ते यामध्ये असे संकेत शोधायला लागतात त्यामुळे त्यांची विचारसरणी योग्य ठरेल. ज्यामुळे त्यांची विचार सरणी चुकीची ठरते, असा तथ्यांकडे ते जाणीवपूर्वक डोळेझाक करतात. बाजारातील परिवर्तनाच्या वेळी अशा प्रकारचे ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. खरं तर यामुळे गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेत असतो. तुम्ही जर एखादा शेअर खरेदी केला असेल आणि त्याबद्दल एखादी नकारात्मक बातमी आली असेल, तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. जो स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे, त्याला घेऊन तुम्ही भावनेच्या भरात वाहवत जाता कामा नये. जर बाजाराच्या दबावाखाली एकदा गुंतवणूकदार आल्यावर तो मोठी चूक करून बसतो. एखाद्या गुंतवणूकदारासाठी हे समजून घेणे अत्यावश्यक आहे की, एखाद्या शेअरची किमत ५२ आठवड्यातील किमान किमतीवर पोहचत असेल तर, कोसळत्या बाजारात
काही गुंतवणूकदार बॅल्व्हयू इनव्हेस्टमेंट करू लागतात. ते अग्रेसिव्ह पद्धतीने अशा शेअरचा शोध घेत असतात, ज्यांची किमत ५२ आठवड्यातील किमान किमतीवर पोहचली आहे. त्यांना असे वाटते की या शेअरमध्ये आधीपासूनच पडझड झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यात गुंतवणूक केल्यामुळे चांगला फायदा मिळू शकेल. अर्थात यापैकी काही स्टॉक्स व्हॅल्यू ट्रॅप्ड सिद्ध होऊ शकतात. या बाबतीत ओम्नी सायन्स कॅपिटलचे सीईओ विकास गुप्ता यांनी सांगितले, ‘५२ आठवड्यातील किमान किमत एखाद्या स्टॉकसाठी रिसर्चचा विषय असू शकतो, पण फक्त किमती पाहून अशा प्रकारच्या शेअरमध्य गुंतवणूक करणे योग्य होणार नाही.’ आल्यावर
कधी कधी असेही आढळून येते की अनेक लहान गुंतवणूकदार बाजारात कोसळणे बहुतेक वेळा एसआयपी अडवून ठेवतात. खर तर मंदीच्या बाजारात एसआयपीद्वारा केलेल्या गुंतवणुकीतून जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता असते.
Hi sir good 👍👍