International investment and diversification
आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि विविधता
सफलता सोपी आहे. जे योग्य आहे तेच करा, योग्य पद्धतीने करा आणि योग्य वेळेवर करा.
आजचे जग खूप लहान झाले आहे. सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था आज एक दुसऱ्यात मिसळून गेल्या आहेत. पूर्वी जशी एका कुटुंबाची सत्ता असायची अगदी तसेच. आज एखाद्या देशावर संकट आले तर ते फक्त त्या देशापुरतेच मर्यादित राहत नाही. खरं तर सर्व जगावर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरुपात काही ना काही परिणाम होतच असतो. अशा काळात शेअर बाजार तर तसाही वेशिक असतो. त्यामध्ये काम करणारे जगातील खूप मोठे भांडवल असते. एकदा गुंतवणूकदाराने शेअर बाजारात आपली गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला किमान एकदा तरी आंतरराष्ट्रीय फंडाचा विचार करावाच लागतो.
गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला आहे की, पोर्टफोलियोमध्ये विविधिता आणण्यासाठी गुंतवणूकदाराने दुसऱ्या देशातील म्युचुअल फंडात गुंतवणूक करायला हवी. ते फीडर फंडात किंवा आंतरराष्ट्रीय फंडात गुंतवणूक करून हे काम करू शकतात. हे फंड दुसऱ्या देशांतील शेअर किंवा फिक्स्ड इनकम सिक्युरटीमध्ये गुंतवणूक करतात.
बऱ्याचशा लोकांमध्ये सुट्टयात परदेशी जाण्याची आवड निर्माण झाली आहे. अनेक मुलांनाही परदेशात शिक्षण घ्यायचे असते. अशा वेळी पोर्टफोलियोमध्ये भौगोलिकदृष्ट्या विविधता आणणे खूप आवश्यक आहे. त्याच बरोबर कधी भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली राहिली नाही तर, हे परदेशी फंड तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न देऊ शकतात. ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी, इंटरनेटच्या अनेक जागतिक कंपन्या युरोप आणि अमेरिकेतून येतात. इंटरनॅशनल फंडामधील गुंतवणूक तुम्हाला अशा प्रकारच्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देतात.
भारतीय गुंतवणूकदारासाठी अनेक प्रकारचे परदेशी फंड गुंतवणुकीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. या दर्जाचे फंड देशावर आधारीत फंड (अमेरिका, ब्राझील इ.), ठराविक क्षेत्र (युरोपीय संघ ), किंवा विषय (टेकालॉजी) मध्ये गुंतवणूक करतात. भारतीय गुंतवणूकदार म्हणून तुम्ही या फंडात भारतीय रुपयामध्ये गुतवणूक करू शकता. एकदा तुम्ही फंडाची निवड केल्यानंतर त्याचे देणे चेकच्या माध्यमातून भारतीय रुपयामध्ये करू शकता. या फंडामध्ये ऑनलाईन गुंतवणूकही केली जाऊ शकते.
भारतीय गुंतवणूकदाराला इंटरनॅशनल गुंतवणूक ऑफर करणारे फंड दोन प्रकारे परदेशी बाजारामध्ये गुंतवणूक करतात. पहिला प्रकार म्हणजे ते थेट परदेशी बाजारात शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात. दुसरे म्हणजे ते एखाद्या परदेशी फंडात गुंतवणूक करू शकतात. यालाच फीडर रूट म्हणतात.
शेअरमध्ये गुंतवणूक करताना रिस्क सोबतच इंटरनॅशनल फंडामध्ये चलनातील किमतीत होणाऱ्या चढ-उताराची जोखीमही असते ही जोखीम परदेशी बाजारात आपल्या चलनाचे मूल्य कमी अधिक झाल्यामुळे निर्माण होऊ शकत असते. घरगुती गुंतवणूकदार रुपयामध्ये गुंतवणूक करीत असतात, पण फंडसना मात्र परदेशी चलनामध्ये गुंतवणूक करावी लागते. या कारणामुळे गुंतवणुकदाराला या फंडात गुंतवणूक करताना अधिक सजग राहण्याची आवश्यकता असते त्यांची नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असते उदाहरणार्थ डॉलरच्या तुलनेत रुपया जास्त कमकुवत झाला तर अमेरिकन फंडात गुंतवणूक करणाऱ्याला फायदा होऊ शकतो किंवा याच्या उलटही होऊ शकते.
इंटरनॅशनल फंडांच्या बाबतीत टॅक्सचे नियम डेट म्युच्युअल फंडासारखेच असतात तीन वर्षांच्या कालावधीसाठी ते कायम ठेवले तर गुंतवणूकदाराला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. हे कर मिळविण्यात आलेल्या नफ्यावर आपल्या टॅक्स स्लॅबच्या आधारे लावले जातात. तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी ते कायम ठेवले तर गुंतवणुकदारो मिळविलेल्या नफ्यावर २० टक्के लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. त्यावर इंडेक्शेशनचा लाभही दिला जातो.